पुणे, १७ डिसेंबर २०२०: स्रियांचा जन्मच मुळी कष्ट सहन करण्यासाठी झालेला असतो, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. पण, आजच्या आधुनिक काळात स्त्रियांनी देखील मोठी झेप घेतली आहे. पण, या सगळ्यात स्त्रीनं स्वताकडं कधी ही जास्त लक्ष्य दिलं नाही आथवा देत ही नाही. नेहमीच त्या दुसऱ्यांचा विचार करत आसतात. पण, याच सर्व गोष्टीमुळं त्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल आणि आजाराबद्दल जाणून घेणार आहोत.
ह्रदयाचे आजार….
ह्रदयाचा आजार स्त्रियांसाठी खूप धोकादायक आसतो. यामुळं तीन पैकी एक मृत्यू होतो. अंदाजे एका महिलेच्या जीवाला प्रत्येक मिनटाला ह्रदयाच्या आजारामुळं धोका निर्माण होतो. छातीचं दुखणं आणि जबडा दुखणं, खांद्याला वेदना, मळमळ किंवा दम लागणं असे लक्षणं दिसून येतात.
या साठी संतुलित आहार आणि व्यायाम हा गरजेचा असतो.
ब्रेस्ट कॅन्सर…..
ब्रेस्ट कॅन्सरची समस्या अनेक महिलांमध्ये आढळून येते. ३८ महिलांमागं एका महिलेचा मृत्यू या कारणामुळं होतो. ब्रेस्टच्या टिश्युपासून या कॅन्सरची सुरवात होते. कॅन्सरच्या पेशी एक ट्युमर बनवू शकतात. त्वचेवर सुज येणं, लालसरपणा येणं किंवा दोन्ही स्तानावर फरक दिसून येतो. असे बदल त्वचेत दिसून येतात.
या साठी वजन नियंत्रणात ठेवणं, पातळ प्रर्थिने खाणं आणि वनस्पती तेल निवडा.
ऑटोम्यून रोग….
ऑटोम्यून रोग हा विकारांचा असा गट आहे. ज्या मधे रोग प्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते आणि टिश्यु नष्ट करतात. या श्रेणी मधे ८० पेक्षा गंभीर तीव्र आजार आहेत. ल्युपस, मल्टीपल स्क्लेरोसिस आणि टाईप -१ मधुमेह यांचा समावेश आहे.
यासाठी उपाय रोगप्रतिकारक शक्ती-संतुलित पोषक आणि पुरक आहार घेणं गरजेचं आहे.
ऑस्टिओपोरोसिस…..
ऑस्टिओपोरोसिस ही अशी परिस्थिती आहे. ज्यामधे हडांची घनता जास्त दरानं कमी होते. हा महिलांसंदर्भातील मोठा मुद्दा आहे. ५० वर्षावरील ३ महिलांपैकी एक महिला आणि ५ पुरूषांपैकी एका पुरूषाला अशक्त हडांमुळं फ्रॅक्चरच्या समस्येला सामोरं जावं लागतं.
यासाठी उपाय म्हणून पुरेसे कॅल्शियम, व्हिटॅमिन डी घेतले पाहीजे आणि नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.
अल्झायमर…..
अल्झायमर रोग हा एक मानसिक बिघाड आहे. जो सामान्यतः मध्यम किंवा वृद्ध वयाच्या व्यक्तीमधे आढळून येतो. मेंदूच्या अध:पतनामुळे हा रोग होतो. पुरूषांपेक्षा महिलांमधे धोका जास्त असतो.
यासाठी उपाय म्हणून मानसिक उत्तेजन, तणावमुक्त नियोजन, योग्य झोप गरजेची असते.
मानसिक आरोग्य…..
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये नैराश्याचे आणि चिंतेचे संकेत आधिक प्रमाणात दिसून येतात. महिल्यांच्या आरोग्य समस्यांमधे नैराश्य ही एक प्रमुख समस्या आहे. दरवर्षी पुरूषांपेक्षा जास्त महिला या आजारानं ग्रस्त आहेत.
यासाठी व्यायाम करणं आणि जमंल तेव्हा विश्रांती घंणे हा उपाय आहे.
महिलांमध्ये आरोग्यासंबंधी विकार उद्भवण्याला अनेक घटक कारणीभूत आहेत. या मधे वयक्तिक जीवनशैली आनुवंशिक, हार्नोमल असंतुलन, वय आणि वंशिकता यांची भूमिका असते. प्रत्येक स्त्रीनुसार या घटकांचा वेगवेगळा परिणाम होतो. तसे महिलांमध्ये आरोग्यासंबंधी विकाराचे संकेत आधीच मिळतात आणि ते भिन्न प्रकाराचे आसतात. जर तुमच्या वजनात काही फरक तुम्हाला जाणवेल, तुमचे केस आणि त्वचा यामधे फरक दिसून आला किंवा तुमचा मुड सतत बदलत असेल किंवा झोपण्याची सवय बदलली असेल तर तुम्ही डाॅक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव