नवी दिल्ली: दिल्लीतील कारखान्याला लागलेल्या आगीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाखांची मदत दिल्ली सरकारने जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळाला भेट देऊन जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये व त्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर केले.
या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले आहेत.
याशिवाय दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनीही मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.
दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडीजवळ एका कारखान्याला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे.