दिल्लीहून बिहारकडे जाणारी बस आग्रा लखनऊ द्रुतगती मार्गावर पालटली

इटावा, २० ऑगस्ट २०२०: दिल्लीहून बिहार मधील मधुबनीकडे जाणारी प्रवासी बस मध्यरात्री आग्रा लखनऊ एक्सप्रेस वेवर उलटली. या प्रवासी बसमध्ये ४५ प्रवासी होते. या अपघातात ३० जण जखमी झाले असून जखमींवर सैफईच्या पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत.

एक्स्प्रेस वेच्या १३२ कि.मी.च्या मार्कजवळ हा अपघात झाला. हा परिसर इटावा जिल्ह्यात येतो. एसएसपी इटावा , आकाश तोमर यांच्या म्हणण्यानुसार, बस दिल्लीहून मधुबनी बिहारकडे जात होती. मध्यरात्र असल्याने बहुतांश प्रवासी झोपले होते. आग्रा लखनऊ द्रुतगती मार्गावर बस जोरात वेगाने धावत होती. त्यानंतर चालकाचे बसवरील संतूलन सुटून बस पलटी झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना उपचारासाठी सैफई रुग्णालयात नेण्यात आले असून येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी १४ जखमींना सोडले असून, १६ प्रवाशांवर उपचार चालू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्या परिस्थितीत बस पलटी झाली, याबाबत यूपी पोलिस तपास करत आहेत. द्रुतगती मार्गावर वेग जास्त असल्याने बरेच अपघात होत असतात.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा