दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्ष्यांची धडक, भुवनेश्वरमध्ये इमर्जन्सी लँडिंग

भुवनेश्वर, ४ सप्टेंबर २०२३ : दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला टेकऑफनंतर काही वेळातच पक्ष्याला धडक दिली. त्यामुळे भुवनेश्वर विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. इंडिगो विमानाचे आज सकाळी भुवनेश्वरमधील बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.

या घटनेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंव्हा जखमी झाल्याचे वृत्त नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात १८० प्रवाशांसह विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवाशी सुरक्षित आहेत.

आज सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी विमानाने भुवनेश्वर विमानतळावरुन नवी दिल्लीसाठी नियोजित वेळेत उड्डाण केले. २०-२२ मिनिटांनंतर सकाळी ८ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वैमानिकांला तांत्रिक बिघाडामुळे परतावे लागले, प्रवाशांना विमानातून उतरण्यास सांगण्यात आले होते. इंडिगो फ्लाईट ६E-२०६५ च्या सर्व प्रवाशांसाठी दुसऱ्या फ्लाईटची व्यवस्था केली जाण्याची शक्यता आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा