दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईला पराभूत करून गाठले अव्वल स्थान

यूएई, 5 ऑक्टोंबर 2021: आयपीएल 2021 मध्ये सोमवारी पुन्हा एकदा कमी स्कोअरिंग गेम दिसला.  दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या या सामन्यात दिल्लीने विजय मिळवला.  केवळ 137 धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाने शेवटच्या षटकात विजय मिळवला आणि चेन्नईचा 3 गडी राखून पराभव केला.  यासह दिल्ली कॅपिटल्सचा संघ पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आहे.
लशेवटच्या षटकात दिल्लीला मिळाला विजय
 या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना केवळ 136 धावा केल्या.  जेव्हा दिल्ली कॅपिटल्सचा संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी बाहेर पडला तेव्हा त्याला झटपट सुरुवात झाली, पण पृथ्वी शॉ लवकरच बाद झाला.  यानंतर शिखर धवनने आपल्या संघाला पुढं नेलं, पण दुसऱ्या बाजूनं विकेट पडत राहिल्या.  बर्थडे बॉय कर्णधार वृषभ पंत देखील कोणताही मोठा चमत्कार करू शकला नाही.
 दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला.  दिल्लीला शेवटच्या षटकात 6 धावांची गरज होती.  पण ड्वेन ब्राव्होने आधी दोन धावा दिल्या आणि नंतर वाइड बॉलही दिला.  मात्र, यानंतर अक्षर पटेलची विकेट पडली पण शेवटी खगिसो रबाडाने चौकार मारला आणि दिल्ली कॅपिटल्स विजयी झाली.  सरतेशेवटी शिर्मन हेटमायरने दिल्लीसाठी फक्त 18 चेंडूत 28 धावा केल्या.
 चेन्नईची फलंदाजी अपयशी ठरली, फक्त रायुडू चमकला
 दिल्लीविरुद्ध चेन्नईची फलंदाजी यावेळीही अपयशी ठरली.  ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने लवकर विकेट गमावल्या, त्यानंतर सुरेश रैनाच्या जागी आलेला रॉबिन उथप्पा.  अंबाती रायडूने चेन्नईसाठी नाबाद 55 धावांची खेळी केली, महेंद्रसिंग धोनी देखील काही चमत्कार करू शकला नाही आणि 27 चेंडूत फक्त 18 धावा करू शकला.  20 षटकांत चेन्नईच्या संघाने अशाप्रकारे 5 गडी गमावून केवळ 136 धावा केल्या.
 दिल्ली पुन्हा गुणतालिकेत अव्वल
 दिल्ली कॅपिटल्ससाठी हा हंगाम चांगला गेला आहे.  चेन्नईला पराभूत केल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा पॉइंट टेबल्सच्या शीर्षस्थानी पोहोचली.  दिल्लीच्या संघाला 13 सामन्यांत एकूण 20 गुण मिळाले आहेत.  तर चेन्नईच्या संघाचे 13 सामन्यात 18 गुण आहेत.  आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.  एका जागेसाठी लढाई अजूनही सुरू आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा