गोल पोस्ट इतर राजकारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या मुंबई दौऱ्यावर...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या मुंबई दौऱ्यावर येणार

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२३ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे (आप) अध्यक्ष व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या शुक्रवारी (ता.२४) मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. कलिना येथील जनरल एव्हिएशन टर्मिनल येथे दुपारी ३ वाजता ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन त्यांचे स्वागत करणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसह, उद्धव ठाकरे गट, तसेच आम आदमी पार्टीचे पदाधिकारी तयारीला लागले आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र अद्याप तशा हालचाली दिसत नाहीत. गेल्या वर्षभरापासून ‘आप’ने मुंबईत विविध आंदोलने केली आहेत.

आरोग्य, शिक्षण आणि महापालिका प्रशासनातील भ्रष्टाचारावर आरोप केले आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मुंबई दौरा हा दुसऱ्यांदा असून यापूर्वी ते २२ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आले होते. उद्या मुख्यमंत्री केजरीवाल व मान मुंबईतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

error: Content is protected !!
Exit mobile version