दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली, १७ ऑक्टोबर २०२२: दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्या घरावर काही अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी सकाळी हल्ला केला असल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्यांच्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्याआहेत. स्वतः स्वाती मालीवाल यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. दरम्यान, या हल्ल्यात स्वाती मालीवाल आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही हानी झाली नाही.

स्वाती मालीवाल यांचे ट्विट :

‘काही वेळापूर्वी एका हल्लेखोराने माझ्या घरात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात माझी आणि माझ्या आईची गाडी खराब झाली आहे. तसेच हल्लेखोराने यावेळी घरात घुसण्याचा प्रयत्न देखील केला. सुदैवाने मी आणि आई, आम्ही दोघेही घरी नव्हतो, नाहीतर काय झाले असते माहीत नाही!

पुढे त्या म्हणाल्या, तुम्ही काहीही करा, मी घाबरणार नाही. महिलांविरोधात काम करणाऱ्यांविरोधात लढा सुरूच राहणार आहे. दरम्यान, स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

केजरीवाल म्हणाले…

या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दिल्लीतील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. त्यावर लक्ष देण्याची गरज असल्याचे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी आल्या होत्या बलात्काराच्या धमक्या

काही दिवसांपूर्वी स्वाती मालीवाल यांनी सांगितले होते की, त्यांना सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या येत आहेत. याबाबत त्यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली आहे. स्वाती मालीवाल यांनी आरोप केला आहे की, जेव्हापासून त्यांनी चित्रपट निर्माता आणि बिग बॉस स्पर्धक साजिद खानविरोधात आवाज उठवला आहे, तेव्हापासून त्यांना विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमक्या दिल्या जात आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा