जनावर मेलं तरी दिल्लीचे नेते शोक करतात, राज्यपाल मलिक यांच्या टार्गेटवर पुन्हा मोदी सरकार

5
पुणे, 8 नोव्हेंबर 2021: मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी शेतकरी आंदोलनावर तोडगा न निघाल्याने केंद्र सरकार आणि बड्या नेत्यांवर पुन्हा एकदा टोला लगावलाय.  ते म्हणाले- आजपर्यंत एवढं मोठं आंदोलन झालं नाही.  शेतकरी आंदोलनात आतापर्यंत 600 लोक शहीद झाले आहेत.  एखादा प्राणी मरण पावला की दिल्लीच्या नेत्यांकडून शोकसंदेश येतो.  आमचे 600 शेतकरी शहीद झाले, त्यांच्यावर कोणताही नेता बोलला नाही.
 महाराष्ट्रातील हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे 5-7 जणांचा मृत्यू झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.  त्यांच्या निधनाबद्दल दिल्लीतून शोकसंदेश पाठवण्यात आले आहेत.  शेतकर्‍यांच्या मृत्यूबद्दल संसदेत शोकप्रस्ताव मांडण्यासाठी आमच्या वर्गातील लोकही बोलले नाहीत.  जयपूर येथील बिर्ला सभागृहात तेजा फाऊंडेशनच्या कार्यक्रमात सत्यपाल मलिक बोलत होते.
सत्यपाल मलिक नेमकं काय म्हणाले ?
“मी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं म्हटलं होतं. देशात एवढे मोठे आंदोलन आतापर्यंत कधी झाले नाही. या आंदोलनात सहाशे लोक शहीद झाले. कुत्रीजरी मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो. पण सहाशे शेतकऱ्यांचा प्रस्ताव लोसभेत मंजूर करु शकले नाहीत,” असे म्हणत सत्यापाल मलिक यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
प्रत्येक फाईल क्लिअर करण्यासाठी 150-150 कोटी रुपये मिळतील
मागील अनेक दिवसांपासून सत्यपाल मलिक मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करताना दिसतायत. शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचार तसेच काश्मीमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी यापूर्वी तिखट भाष्य केलेलं आहे. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य तसेच अंबानी यांच्या फाईल्स मंजूर करण्यासाठी 300 कोटींची लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले होते. “काश्मीरला गेल्यानंतर माझ्यासमोर दोन फायली मंजुरीसाठी आणल्या गेल्या. एक अंबानी आणि दुसरा आरएसएसशी संबंधित होता, जो मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन (पीडीपी-भाजप) सरकारमध्ये मंत्री होता. तुम्हाला प्रत्येक फाईल क्लिअर करण्यासाठी 150-150 कोटी रुपये मिळतील, असे मला सचिवाने सांगितले होते,” अशी माहिती मलिक यांनी 22 ऑक्टोबर रोजी एका भाषणादरम्यान दिली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे