नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशाची राजधानी दिल्लीतील १७३४ अवैध वसाहती नियमित केल्या आहेत. याबाबत आज दिनांक २२ डिसेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करण्यासाठी भाजपच्या वतीने रामलीला मैदानावर धन्यवाद रॅलीच आयोजन करण्यात आल आहे, तरी या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक येतील, अश्या प्रकारचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. तसेच या रॅलीमध्ये दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजवण्याची शक्यता आहे.
दिल्लीमध्ये अवैध वसाहतींना नियमित केल्याने जवळपास ४० लाख लोकांना त्यांच्या मालकीचा हक्क मिळू शकणार आहे. या रॅलीमध्ये ७ खासदार २८१ मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक आणि इतर कार्यकर्त्यांवर समर्थकांना जमवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या रॅली च्या माध्यमातून भाजप दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात करणार अशी माहिती समोर येतय. आणि त्यासाठी ही वातावरण निर्मिती असल्याच बोलल जात आहे.