दिल्ली : शिक्षिकेने पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला पहिल्या मजल्यावरून फेकले; गुन्हा दाखल

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२२ : दिल्लीत पाचवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीला शाळेच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन शिक्षिकेनेच ढकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत संबंधित विद्यार्थिनी जखमी झाली असून तिच्यावर बारा हिंदू राव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या प्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दिल्लीच्या फिल्मिस्तान भागातील मॉडेल बस्ती भागातल्या प्राथमिक विद्यालयात शुक्रवारी हा प्रकार घडला. गीता देशवाल नावाच्या शिक्षिकेने हे कृत्य केले आहे. या शिक्षिकेने इयत्ता पाचवीत शिकणार्‍या वंदना नावच्या विद्यार्थिनीला बेदम मारहाण केली, तिच्यावर कात्रीने हल्ला केला, त्यात तिच्या डोक्याला दुखापत केली. यानंतरही तिचे समाधान न झाल्याने तिला पाहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिले, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.

  • जखमी विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक

या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीवर बारा हिंदू राव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. या बाबत अधिक माहिती देताना सेंट्रल दिल्लीच्या डीसीपी श्वेता चव्हाण यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यावरून या प्रकरणी भदंवि कलम ३०७ अंतर्गत या महिला शिक्षकेच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • आरोपी शिक्षिका निलंबित

दिल्ली निगम नगरच्या एका अधिकार्‍यांने सांगितले की, संबंधित शिक्षिकेस या कृत्यामुळे निलंबित करण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा