दिल्ली अनलॉक, महाराष्ट्र अजूनही लाॅक

नवी दिल्ली, २९ मे २०२१: देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होते आहे आणि अश्यातच काही राज्ये हे आपल्या भागातील निर्बंध शिथिल करण्याच्या उद्देशाने कार्य करू लागले आहे. ज्यामधे प्रामुख्याने महाराष्ट्र दिल्ली चा समावेश आहे. कोरोना चे सर्वात जास्त तांडव देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्र या राज्याला प्रामुख्याने पहायला मिळाला.
दिल्लीत सध्या परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तर कोरोना देखील आटोक्यात येत असून प्रशासन आता काही सकारात्मक पाऊले उचलण्याच्या दृष्टीने विचार करु लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लाॅकडाऊन शिथिल केले जाणार असल्याची माहिती दिली आहे.
“दिल्लीतील लाॅकडाऊन हळूहळू उठविण्यात येणार आहे. सर्वात आधी बांधकाम आणि कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, अनेक कामगार गरीब लोक यावर जास्त अवलंबून आहेत. पुढील एक आठवड्यासाठी दोन्ही क्षेत्र खुली राहतील”. असे केजरीवाल यांनी सांगितले.
एकीकडे दिल्ली ही अनलॉक च्या दिशेने वाटचाल करत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मात्र अजूनही लाॅकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढवण्यात आला असून आता राज्यात पुढील १५ जून पर्यंत लाॅकडाऊन कायम असणार आहे. ज्याची नियमावली १ जून रोजी जाहीर करण्यात येईल.
राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. जिथे रुग्ण संख्या कमी आहे तिथे शिथिलता दिली जाऊ शकते. मात्र त्या बद्दल ला तारखेला कळेल. असे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले. मात्र राज्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असून ही घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे अनेक व्यापारी वर्गामधे असंतोष निर्माण झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा