दिल्ली विमानतळावर आरडीएक्स संशयास्पद बॅगेत सापडला

दिल्ली: शुक्रवारी पहाटे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल वर संशयास्पद बॅग सापडली, त्यामध्ये आरडीएक्स सामग्री असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पहाटे १ च्या सुमारास एक कॉल आला, त्यानंतर संशयीत बॅग सीआयएसएफच्या जवानांना आगमन टर्मिनलच्या गेट नंबर २ जवळ सापडली.४ नंबर स्तंभाजवळ जवळच पडलेली काळ्या रंगाची ट्रॉली बॅग घटनास्थळावरून काढून खड्ड्यात ठेवली होती. पोलिसांनी तातडीने कारवाई केली व त्यामुळे प्रवाशांमध्ये दहशत पसरली, प्रवाशांना काही काळ टर्मिनलमधून बाहेर पडू दिले नाही. टी ३ बाहेरील रस्तेही रोखले गेले होते.
बॉम्ब शोध आणि विल्हेवाट पथकाची (बीडीडीएस) पथक बोलाविण्यात आली आणि हा परिसर बंदोबस्तात ठेवण्यात आला. काही तास वाहने व प्रवाशांची वाहतूकही थांबविण्यात आली. पहाटे दीडच्या सुमारास बीडीडीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आणि प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) नुसार कारवाई केली. बॅगच्या एक्स-रे प्रतिमा बॉम्ब पथकाने काढल्या आहेत, ज्या स्पष्टही नव्हत्या आणि संशयास्पद वाटल्या.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा