नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतील सर्व शाळा ५ नोव्हेंबर पर्यत बंद राहणार असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.
सध्या दिल्लीतील हवामानातील दर्जा अतिशय खराब झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. पंजाब आणि हरियाणात राब जाळण्याचा प्रकार सुरु होतात त्यामुळे हे सारे प्रदूषण दिल्लीत पसरते. पर्यावरण प्रदूषण प्राधिकरणाने दिल्ली एनसीआरमध्ये सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली आहे. यानुसार फटाके वाजविण्यास देखील ५ नोव्हेंबरपर्यत बंदी घालण्यात आली आहे.