डिलिव्हरी बॉय ते वास्तववादी दिग्दर्शक

आपले नशीब आजमावण्यासाठी अनेक कलाकार चित्रपट सृष्टीत येतात. परंतु त्यातील बोटावर मोजण्याइतके कलाकार यशस्वी होतात. तर अनेकांच्या पदरी निराशा पडते.
असाच चित्रपट सृष्टीतील अवलियाचा प्रवास असाच आहे. ते म्हणजे चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर.

एकेकाळी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारे मधुर भांडारकर आज हिंदीतील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात.
झी टीव्ही ने ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या नव्या संगीतमय चॅट कार्यक्रमासाठी मधुर भांडारकर यांच्याशी अनेक विषयांवर गप्पा मारल्या. त्यात स्वतः भांडारकर यांनी स्वतः याविषयी माहिती दिली आहे. सुरुवातीला मी जवळपास चार वर्ष घरोघरी जाऊन लोकांना व्हिडिओ कॅसेटस देत असे. अगदी मला मिथुनदाही याच कामासाठी ओळखतात. कारण मी त्याकाळी त्यांनाही कॅसेट्स दिलेल्या आहेत. तेव्हा मला कॅसेट्सवर चित्रपट पाहताना आपणही चित्रपट दिग्दर्शक व्हावं असं वाटत असे. आज मी २० वर्षानंतर दिग्दर्शक म्हणून ओळखला जात आहे.
मला पुढे काय करायचं आहे, ते आधीपासूनच मला ठाऊक असल्यामुळे मी लहानपणापासूनच सेटवर जाऊन चित्रपटांचं शूटिंग पाहत असे.
‘झी टीव्ही’ च्या ‘प्रो-म्युझिक काऊंटडाऊन’ या कार्यक्रमात बॉलिवूडचे सर्वोच्च कलाकार आपली कारकीर्द, प्रेमप्रकरणे तसेच वैयक्तिक जीवन वगैरेंबाबत स्वत: माहिती देणार आहेत. त्यांनी अनेक वास्तववादी चित्रपट दिले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा