पैठण तालुक्यात कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी

औरंगाबाद, दि.१२ मे २०२०: लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पैठण तालुक्यात कापूस खरेदी केंद्राची संख्या कमी असल्याने संथ गतीने खरेदी सुरू आहे.
सरकारने पैठण तालुक्यात कापूस खरेदी केंद्राची संख्या व कापूस खरेदीचा वेग वाढवून शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी मागणी पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता भाऊ गोर्डे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

दत्ता भाऊ गोर्डे यांनी पत्रात नमूद केले आहे की, लॉकडाऊनपूर्वी पैठण तालुक्यात कापूस खरेदी केंद्राची संख्या ३ होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते. मात्र २८ एप्रिल रोजी सरकारने कापूस खरेदीस परवानगी दिली आहे. त्यानंतर दोन कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. दोनच दिवसात त्यातील एक केंद्र बंद पडले.

त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर आपला माल विक्री करण्यासाठी अडचणी येत आहेत. शासनाने कापूस खरेदी करावा म्हणून आतापर्यंत पैठण तालुक्यात ३८०० शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. या अनुषंगाने सरकारने पैठण तालुक्यात कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवावी, असे दत्ता भाऊ गोर्डे यांनी पत्रात म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा