लखनऊ, २० नोव्हेंबर २०२०: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याविरूद्ध उत्तर प्रदेशच्या प्रतापगड जिल्ह्याच्या कोर्टात तक्रार दाखल करण्यात आलीय. अखिल भारतीय ग्रामीण बार असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञान प्रकाश शुक्ला यांनी लालगंज दिवाणी न्यायालयात फिर्याद दिली आहे. ही तक्रार ओबामा यांच्या पुस्तकाशी संबंधित आहे. त्यावर १ डिसेंबर रोजी सुनावणी होईल.
ज्ञान प्रकाश शुक्ला म्हणाले की, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याविरोधात बेकायदेशीर वक्तव्य करून भारतीय निवडणूक यंत्रणेचा अवमान केला आहे आणि निवडणूक आयोगासारख्या नियामक संस्थांद्वारे घटनेच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
राष्ट्रपती पदावरून पायउतार झाल्यानंतर बराक ओबामा यांनी त्यांचे अनुभव ‘ए प्रॉमिसन लँड’ लिहिलेलं आहेत. या पुस्तकाची भारतातही चर्चा आहे, कारण या पुस्तकाच्या आत कॉंग्रेस नेते राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर काहींचा उल्लेख आहे.
राहुल गांधींवर बराक ओबामा यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, ‘त्यांच्यात (राहुल गांधी) एका अश्या बैचेन आणि अपरिपक्व विद्यार्थ्याचे गुण आहेत ज्यानं आपला अभ्यास केला आहे आणि शिक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण, त्यांच्या बाबतीत असं दिसत नाही, त्यांच्यात योग्यतेची कमी आहे. तसेच कोणत्याही एका विषयावर प्रभुत्व मिळवण्याचा उत्साह देखील नाही.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे