रस्त्यावरील धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी

4

इंदापूर, दि. १५ जुलै २०२०: इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर – न्हावी रस्त्याच्या बाजूने अनेक झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. पावसाळी वातावरण आणि सोसाट्याचा वारा यामुळे जीर्ण झालेल्या झाडांमुळे मोठा अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता आहे.

वेळोवेळी याबाबत प्रवाशांनी संबंधित प्रशासनाला कळविले आहे तरीदेखील प्रशासन यावर कसलीच कार्यवाही करत नसल्याचे दिसून येत आहे संबंधित विभाग नक्की कोणत्या अपघाताची वाट पाहत आहे हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

त्यामुळे प्रशासनाने त्वरित रस्त्याच्या बाजूची जीर्ण झालेली धोकादायक झाडे त्वरित काढावीत अशी मागणी होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा