तहसीलदारांकडे बाजार पेठ व्यवसाय चालू करण्याची मागणी

कर्जत, १८.मे.२०२०: जिल्ह्यातील इतर नगर पंचायत परिषदाच्या हद्दीत व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली जात असताना. कर्जत नगर पंचायत हद्दीत मात्र त्यास प्रतिबंध केला जात असून, प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर वा दबावाखाली काम करत आहे. असा गंभीर प्रश्न कर्जत येथे भाजपाच्या वतीने निवेदन देत उपस्थित करण्यात आला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत शहरासह जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कर्जत नगर पंचायत हद्दीतील व तालुक्यातील व्यवसायिकांना नियम व अटी घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी. यासंबंधीचे निवेदन भारतीय जनता पक्ष कर्जत शहर यांच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले, या निवेदनात म्हटले आहे की,नगर जिल्ह्यातील राहुरी नगर परिषद, श्रीगोंदा नगर परिषद, देवळाली नगर परिषद व इतर काही ठिकाणी कोरोनाचे पेशंट आढळलेले नाहीत. त्यामुळे तेथील संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी काही शर्ती आणि अटींवर व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

त्याच पद्धतीने कर्जत शहर व तालुक्यात अद्याप एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेले नाही. गेल्या दोन महिन्यापासून व्यवसायिकांनी अत्यंत संयम राखत सहकार्य करून आपले व्यवसाय बंद ठेवलेले आहेत मात्र या व्यवसायिकांच्या पुढे ही अनेक अडचणी उभ्या आहेत. अनेक व्यवसायिकांच्या जागा भाड्याने आहेत. अनेकांकडे कर्मचारी आहेत. त्याना पगार
देणे आवश्यक आहे. व्यवसायाला कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे शहरातील दुकाने सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे काही शर्ती व अटींवर कर्जत शहरातील व्यवसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
कर्जत तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे याना हे निवेदन दिले. यावेळी भाजपाचे नेते कर्जत नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे शहराध्यक्ष वैभव शहा, प्रसाद ढोकरीकर, भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष संतोष भंडारी, व्यापारी असो, चे उपाध्यक्ष प्रसाद शहा, अमृत काळदाते, अनिल गदादे, तात्यासाहेब क्षिरसागर, सुरेश नहार, अभिकेश बोरा, पोपटराव घालमे, मयूर विभूते, प्रभाकर पवार आदी उपस्थित होते.

कोरोनाशी लढताना जिल्ह्यात विविध नगर परिषद, नगर पंचायतीच्या हद्दीत व्यवसायिकांना परवानगी मिळते मात्र कर्जत नगर पंचायत हद्दीतच व्यवसायिकांना दुकाने उघडण्यास परवानगी का दिली जात नाही याचे नेमके कारण काय? प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करत आहे, प्रशासनाने असा दुजाभाव करण्याचे कारण काय असे प्रश्न यानिमित्ताने राऊत व शहा यांनी उपस्थित केले आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा