लोणी काळभोर, दि. ३० मे २०२०: पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दत्तात्रय चोरमले यांनी संघटनेच्या वतीने मागणी केली आहे.
निवेदनातून केलेली मागणी धनगर समाजाला आराध्य असणाऱ्या राणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण भारत देशभर आहे. हे वेगळं सांगण्याची आपणास गरज नाही. धनगर समाज हा कष्टाळू, प्रामाणिक आहे , तो स्वतःचे पोट स्वतः भरू शकतो असा आहे. फक्त समाजाची एक खंत आहे की त्यांना आराध्य असणाऱ्या अहिल्याआईसाहेब यांना पाहिजे तसा शासनाकडून सन्मान होताना दिसत नाही. आमच्या समाजाच्या वतीने आपल्याला मागणी आहे की आपण शासनाच्या माध्यमातून असा एक आदेश काढावा की पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालय, सर्व ग्रामपंचायत सर्व पंचायत समिती, सर्व जिल्हा परिषद कार्यालय, सर्व निमशासकीय कार्यालय सर्व सहकारी संस्था या ठिकाणी बंधन कारक असले पाहिजे असा आदेश काढावा.
अशी मागणी संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नवनाथ ढगे, महिला प्रदेशाध्यक्ष दुर्गा गावंडे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्तात्रय चोरमले, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नामदेव दडस, उत्तर महाराष्ट्र महिला अध्यक्ष शितल गवते, विदर्भ महिला अध्यक्ष शारदा ढोमणे, पश्चिम महाराष्ट्र महिला कार्याध्यक्ष प्रणिता घुरडे यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे