शिरापूर येथे ऊस बेणे प्रक्रिया प्रात्यक्षिक

बारामती, दि. २२ जून २०२० : दौंड येथे नुकतीच ऊस बेणे प्रक्रिया कार्यशाळा पार पडली . कृषी सहाय्यक के.ये.काझडे यांनी हे आयोजन केले होते. हा कार्यक्रम कृषी तंत्रज्ञान अंतर्गत (आत्मा) या मार्फत आयोजित करण्यात आला होता.

या शेतीशाळेत मुख्य प्रवर्तक एस. बी. मोरे माती परीक्षण करण्यासाठी माती नमुना कसा काढावा याचे मार्गदर्शन करून आलेल्या अहवालानुसार सेंद्रिय, जैविक व रासायनिक खतांची मात्रा किती द्यावी याचे मार्गदर्शन केले. यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी आप्पासाहेब खाडे यांनी रासायनिक पद्धतीने ऊस बेणे प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन केले.

यामध्ये १०० ली. पाण्यात ३०० मिली मलोथिआॅन, १०० ग्रॅम बावीस्टिन पावडर टाकून उसाच्या कांड्या बाहेर काढाव्या नंतर सदर  कांड्या जैविक प्रक्रियेसाठी दुस-या पाण्यात टाकाव्या यात १०० पाण्यात ४ लिटर अझोटोबॅक्टर व १.२५ लिटर पी. एस. बी. घेऊन १० मिनिटे बुडवून काढून सावलीत सुकवून नंतर ऊस लागण करावी ही बेणे प्रक्रिया केल्यामुळे एकरी १५ ते २० टक्के उत्पादन वाढू शकते असे कृषी पर्यवेक्षक जगताप यांनी सांगितले.

या वेळी हरिभाऊ कापसे, भालचंद्र ठोंबरे, शिवाजी कापसे, कपिल ठोंबरे, राजेंद्र कापसे, सुरेश कापसे, रवींद्र कदम, भगवान खेडकर, यशवंत ठोंबरे, राजू पवार हे शेतकरी उपस्तीत होते. सदर प्रात्यक्षिक कार्यक्रम भूषण ठोंबरे यांच्या शेतावर घेण्यात आला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा