“इंडो-पॅसिफिक सुरक्षित करण्यासाठी” भारताच्या सर्वात शक्तिशाली missile destroyer ship ची नियुक्ती

13

मुंबई, 22 नोव्हेंबर 2021: इंडो-पॅसिफिक हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा मार्ग असून तो सुरक्षित ठेवणे हे भारतीय नौदलाचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले.

“इंडो-पॅसिफिक हा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि तो जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. हा मार्ग सुरक्षित ठेवणे हे भारतीय नौदलाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे,” असे सिंग यांनी मुंबईत आयएनएस विशाखापट्टणमच्या कमिशनिंग समारंभात बोलताना सांगितले.

“संपूर्ण जग येत्या काही वर्षात आपली लष्करी शक्ती वाढवत आहे आणि संरक्षण बजेटवरील खर्च वाढेल. आम्ही स्वदेशी जहाज बांधणी केंद्राच्या विकासाकडे वाटचाल केली आहे,” सिंग म्हणाले.

ते पुढे म्हणाले, भारतीय नौदलाने ऑर्डर केलेल्या 41 जहाजांपैकी 38 जहाजे भारतात विकसित करण्यात आली आहेत. हे स्वदेशीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.” श्री सिंह यांनी रविवारी सकाळी मुंबईत आयएनएस विशाखापट्टणमला औपचारिकपणे कार्यान्वित केले.

INS विशाखापट्टणम हा प्रोजेक्ट 15B चे पहिले stealth-guided missile destroyer ship आहे. INS विशाखापट्टणम ची निर्मिती स्वदेशी steel DMR 249A वापरून करण्यात आली आहे आणि भारतात बांधण्यात आलेल्या सर्वात मोठ्या destroyerपैकी एक आहे ज्याची एकूण लांबी 163m आहे आणि 7,400 टन पेक्षा जास्त विस्थापन (displacement) आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा