पुणे, ३ ऑगस्ट २०२१: आई वडील त्यांच्या मुलींचा जन्म होताच त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे जोडू लागतात आणि चांगले गुंतवणूक धोरण घेण्याचे नियोजन करू लागतात. अशा परिस्थितीत भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) मुलींना लक्ष्यात ठेवून एक विशेष योजना आणली आहे. त्याचे नाव एलआयसी कन्यादान पॉलिसी आहे. एलआयसी’ची ही योजना कमी उत्पन्न असलेल्या पालकांना मुलींच्या लग्नासाठी पैसे जमविण्यास मदत करते.
जाणून घ्या, या पॉलिसी बद्दल सर्व
LIC कन्यादान पॉलिसी अंतर्गत एका गुंतवणूकदाराला दररोज १३० रुपये (वार्षिक ४७,४५० रुपये) जमा करावे लागतील. पॉलिसी मुदतीच्या ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी प्रीमियम दिले जाईल. २५ वर्षांनंतर, एलआयसी त्याला सुमारे २७ लाख रुपये देईल. एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये नोंदणीसाठी गुंतवणूकदाराचे किमान वय ३० वर्षे आहे आणि गुंतवणूकदाराच्या मुलीचे किमान वय १ वर्ष असावे.
मॅच्युरिटीवर २७ लाख रुपये मिळतील
या पॉलिसीचा किमान मैच्योरिटी कालावधी १३ वर्षे आहे. जर कोणत्याही कारणामुळे विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीला एलआयसीच्या वतीने अतिरिक्त ५ लाख रुपये द्यावे लागतील. जर एखाद्या व्यक्तीने ५ लाख रुपयांचा विमा घेतला, तर त्याला २२ वर्षांसाठी १,९५१ रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागेल. वेळ पूर्ण झाल्यावर LIC कडून १३.३७ लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, जर एखाद्या व्यक्तीने १० लाखांचा विमा घेतला, तर त्याला महिन्यासाठी ३,९०१ रुपयांचा हप्ता भरावा लागेल. २५ वर्षानंतर LIC द्वारे २६.७५ लाख दिले जातील.
आयकर कायदा १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर सूट
गुंतवणूकदार भरलेल्या प्रीमियमवर कर सूट मागू शकतो. कर सूट जास्तीत जास्त १.५० लाखांपर्यंत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र यासारखी महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे