डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांना करणे दाखवा नोटीस

 उस्मानाबाद (प्रतिनिधी – ज्ञानेश्वर शिंदे): उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (डेप्युटी सीईओ) अजिंक्य पवार यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस उघडकीस आल्यामुळे त्यांना अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे शासकीय वाहन घेऊन पुण्याला गेले होते. इतकेच काय तर त्यांनी मुख्यालय सोडण्यापूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली नव्हती. उस्मानाबाद लाइव्हने या संदर्भात सर्वप्रथम वृत्त प्रकाशित करून अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस आणला होता. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या पूर्वीही काही शासकीय अधिकार्‍यांची अशी बेजबाबदार वागणूक समोर आली आहे. एकीकडे प्रशासन आणि पोलिस परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात असताना दुसरीकडे काही अधिकारी मात्र बेजबाबदारपणे वागत आहेत.
दरम्यान उस्मानाबाद परिसरामध्ये अनेक लोक आपल्या घरापासून इतर जागी अडकून पडले आहेत. यासंदर्भात पोलिसांकडे ७० हजार अर्ज आले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा