जल संपदा मंत्री जयंत पाटील मुख्यमंत्री होण्यास उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पाठिंबा

मुंबई, २२ जानेवारी २०२१: विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि महाराष्ट्रात भाजप शिवसेना युतीला जनतेचा कौल मिळाला पण ऐन जागा वाटपच्या समसमान प्रकारावरून ते चांगलेच ताणले गेले आणि महाराष्ट्रात सत्तेसाठीचे राजकरण तापले आणि सरते शेवटी शरद पवारांच्या मध्यस्थी मुळे भाजप शिवसेना युती तुटली आणि काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्राला मिळाले.

महाविकास आघाडीचे सरकार पडणार आसल्याच्या बातम्या मिडियावर आणि सोशल मिडियावर चालूच होत्या. तरी देखील या तीनही पक्षांनी महाराष्ट्र व्यवस्थित कार्य करण्याचे काम हातळले. या सरकारला आज जवळपास दिड वर्ष पुर्ण होत आले आसून आजही महाविकास आघाडीचे सरकार उभे आहे. पण, त्यांच्या विषयीचे वेगवेगळे खुलासे मात्र महाराष्ट्राला छोटे छोटे धक्के देणारेच असतात.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका युट्युब वाहिनीला दिलेली मुलाखत सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केलं होतं. “दीर्घकाळ राजकारणात काम करणार्या कोणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, असे ते म्हणाले. “तर त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आसेल तर मी पाठिंबा देतो असे म्हटले.

भाजपचा टोला….

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. असं म्हटलं आणि राजकीय रिंगणातून प्रतिक्रिया उमटू लागल्या. भाजप खासदार गिरीश बापट यांनी टोला लगावत, “मला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे, असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती, त्यावेळी ते बोलले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा