अहमदनगर, १७ ऑगस्ट २०२३ : महामानवांच्या बाबत बेताल वक्तव्य सहन करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी संभाजी भिडे यांचे नाव न घेता दिला आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त अजित पवार बोलत होते. शिर्डी येथील काकडी या गावी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ आई, शाहू महाराज, माहात्म्य ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर हे महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहेत. यांचा आदर केलाच पाहिजे. त्याबाबत कोण बेताल वक्तव्य करता कामा नये. याची दक्षता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत आहेत. असं अजित पवारांनी सांगितलं.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर