नवी दिल्ली: गेल्या दोन ते तीन वर्षांपासून देशाचा आर्थिक विकास दर हा ढासळत चालला आहे. २०१५-१६ च्या दरम्यान हा विकास दर ८ पर्यंत गेला होता. त्यावेळेस भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था झाली होती. परंतु मागील काही वर्षांमध्ये सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे व देशाबाहेरील काही घडामोडींमुळे आर्थिक मंदीचे वातावरण तयार झालेले दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक संघटनांनी भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी झाल्याचे नमूद केले होते.
चालू आर्थिक वर्षामध्ये देशाचा विकास दर ५.६ टक्के राहील असा अंदाज पतमानांकन संस्था इंडिया ग्रीटिंग्स अँड रिसर्च या फीज समूहाच्या सहाय्यक कंपनीने वर्तविला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.१ राहील असा अंदाज या संस्थेने या आधी वर्तवला होता. तर जुलै ते सप्टेंबर तिमाहीत विकास दर ४.७ टक्के राहील असे सांगितले आहे. केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलल्यानंतर देखील देशाचा विकास दरात घट होताना दिसत आहे. त्यामुळे या आधी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा ही विकास दर कमी असेल असे या संस्थेचे म्हणणे आहे. अर्थव्यवस्थेला ५.६ टक्के चा विकास दर गाठण्यासाठी देखील सरकारला बरेच प्रयत्न करावे लागतील. नंबर मात्र जर सरकार वित्तीय तूट ३.३ टक्के ठेवण्याच्या आपल्या उद्दिष्टांवर कायम राहिल्यास देशाचा विकास दर ५.६ टक्के यांच्याही खाली असेल असेही या पतमानांकन संस्थेने व्यक्त केले आहे.