नवी दिल्ली, दि. ३ ऑगस्ट २०२० : देशात कोरोना रुग्णांची संख्या ही १७ लाखांच्या पार गेली असताना एक सर्वात मोठी बातमी आली . देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनाच आता कोरोनाची लागण झाली आहे. अमित शहा यांनी स्वतः ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःची टेस्ट करवून घेतली आणि त्यात त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यांची प्रकृती स्थिर आहे मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते रुग्णालयात भर्ती झाले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्यांना स्वतःची टेस्ट करवून घेत स्वत:ला आयसोलेट करून घेण्याचे आवाहन केले आहे.
देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत असून भारतात हा आकडा आता १७ लाखांच्या वर गेला आहे. यासोबतच अमेरिका आणि ब्राझिल नंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र भारतात मृत्युदर कमी असल्याचं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी आपण स्वतःची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे