देशातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढणार?

नवी दिल्ली, दि.२७ मे २०२० : देशातील कोरोनाग्रस्ताचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चौथ्या लॉक डाऊनच्या घोषणा करण्यात आली होती. मात्र आकडेवारी कमी होण्या ऐवजी वाढत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे. कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पहाता केंद्राकडून १५ जूनपर्यंत लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तशा चर्चा आता सूरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे देशात आता पाचवा लॉक डाऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या ४ थ्या लोकडाऊनवर निरीक्षण केले जात असून केंद्राकडून त्याचा अभ्यास केला जात आहे. त्यानंतर त्याचा अहवाल मागवून पुढच्या लॉक डाऊनचा निर्णय घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या २४ तासामध्ये कोरोनाचे ६ हजार ५३५ प्रकरणं समोर आली तर १४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १ लाख ४५ हजार ३८० इतका कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला आहे. तर ४ हजार १६७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६० हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आकडा ही गंभीर बाब आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा