गोल पोस्ट शैक्षणीक देशातील विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ १९ व्या स्थानी

देशातील विद्यापीठांच्या यादीत पुणे विद्यापीठ १९ व्या स्थानी

पुणे, दि.१२ जून २०२०: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून करण्यात आलेल्या  नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क(NIRF) जाहीर करण्यात आले आहे. त्यात देशात आयआयटी मुंबई चौथ्या स्थानावर, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ १९ व्या स्थानावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यातील 12 शैक्षणिक संस्था,विद्यापीठांना ओव्हर ऑल रँकिंगमध्ये पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळवले आहे. पहिल्या
शंभरच्या यादीमध्ये पुणे विद्यापीठासह सिम्बॉयसिस, डॉ.डी वाय पाटील, भारती विद्यापीठ यांचा समावेश आहे. याशिवाय देशाच्या अभियांत्रिकी विद्यालयाच्या यादीमध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग देशात पन्नासाव्या स्थानावर आहे.

न्युज अन कट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version