देशमुखांनी राजीनामा देण्याची गरज नाही: जयंत पाटील

9

नवी दिल्ली, २२ मार्च २०२१: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. यानंतर विरोधी पक्षाकडून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. मात्र, काल दिल्लीत शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा देण्याची गरज नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

ही बैठक झाल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान पत्रकारांनी त्यांना अनिल देशमुख यांचे विषयी प्रश्न विचारला असता त्यांनी राजीनामा देण्याची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अनिल देशमुख यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येत आहे. ही बैठक तब्बल अडीच तास चालली. या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

काय म्हणाले जयंत पाटील

“सध्या महाराष्ट्र एटीएस या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएही तपास करत आहे. या चौकशीतून काहीतरी ठोस बाहेर येईल असा विश्वास आहे. जे गुन्हे झाले आहेत त्याबाबत खोलात जाऊन गुन्हे करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तो तपास लवकरच पूर्ण होईल. गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, त्यावरुन लक्ष विचलित करण्याची गरज नाही. अंबानींच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणावरच फोकस राहील, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे