कर्जत, दि. २७ जुलै २०२०: कर्जत तालुक्यात रुग्ण सेवा हीच आपली ईश्वर सेवा मानून तेच आपले कर्तव्य व जबाबदारी समजणाऱ्या डॉक्टर विलास काकडे यांचे आज दुःखद निधन झाले.
डाॅ काकडे हे सुरूवातीला कोरोना पोझिटिव्ह आले होते. मात्र नंतरच्या चाचणीत ते कोरोना निगेटिव्ह असल्याचा अहवाल म्हटले गेले आहे. पण त्यांच्या शरीरातील अवयव हे निकामी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे कर्जत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.संदिप पुंड यांनी दिली आहे.
काकडे यांच्या वर अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात प्रथम उपचार सुरू होते. नंतर त्यांना पुणे येथे नेण्यात आले. त्याच्यावर नाॅन कोरोना रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. आज शेवटी ते काळाच्या पडद्याआड गेले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: जयहिंद पौरष