विकसित भारत संकल्प यात्रा, रत्नागिरीच्या ग्रामीण भागात कृषी योजनांचा जागर

रत्नागिरी १८ डिसेंबर २०२३ : रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील मौजे-ओझरखोल येथे, विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम अंतर्गत उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे, फळपीक विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका महत्त्व, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, शेतकरी अपघात विमा आदी योजनेंबाबत कृषी सहाय्यक घोबाळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच समित जथियार, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभात वाडकर, मुरलीधर वाडकर, व इतर ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. सुभाष रावजी पाताडे यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा या योजनेचा २ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला.

कृषि पर्यवेक्षक मिनल शिंदे यांनी दापोली तालुक्यातील मौजे- नवानगर येथे शेतकऱ्यांना कृषीविषयक केंद्र व राज्य पुरस्कृत मुख्य योजना फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री फसल विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, सेंद्रिय शेती आदीबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच अमित मुरचवडे, उपसरपंच शकुंतला महाडिक ग्रा.प.सदस्य, इतर शासकीय विभागातील कर्मचारी वर्ग, पी.एस.माने कृ.स.खेर्डी उपस्थित होते.

विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमांतर्गत ग्रामपंचायत विल्ये व ग्रामपंचायत बोंड्ये येथे कृषी विभागाच्या विविध योजना प्रामुख्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, आंबा काजू पिकावर कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना आणि फवारणी करताना घ्यावयाची काळजीआदी योजनेविषयी तालुका कृषी अधिकारी भोये यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी तसेच तलाठी, पोलिस पाटील, कृषी सहाय्यक सचिन पवार उपस्थित होते.

मंडणगड तालुक्यातील ग्रामपंचायत माहू येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच विजय बाईत, ग्रामसेवक श्रीमती चांदीवडे, आरोग्य सेवक, तलाठी गावकर, एचपी गॅस प्रतिनिधी उदय मर्चंडे व कृषी सहाय्यक प्रकाश माळी उपस्थित होते. कार्यक्रमात केंद्र पुरस्कृत पीएमएफएमई योजना, पीएम किसान, जमीन आरोग्य पत्रिका, पीएमएफबीवाय, एमआरईजीएस फळबाग लागवड, किसान क्रेडिट कार्ड, प्रधान मंत्री सूक्ष्म सिंचन योजनेची माहिती देण्यात आली.

मौजे – बोंडीवली येथे उपस्थित शेतक-यांना कृषीविषयक केंद्र व राज्य पुरस्कृत मुख्य योजना पीएमएफएमई, पीएम किसान, फळपिक विमा योजना, पीएमकेएसवाय प्रधानमंत्री फसल विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका वितरण अभियान, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, सेंद्रिय शेती आदी योजनेबाबत माहिती कृषी पर्यवेक्षक मिनल शिंदे यांनी दिली. सरपंच विजय नादे, उपसरपंच अनिता साळवी व ग्रा.प.सदस्य इतर शासकीय विभागातील कर्मचारी वर्ग, पी.एस.माने कृ.स.खेर्डी उपस्थित होते.

संगमेश्वर तालुक्यातील मौजे – वांद्री येथे उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभाग यांच्या मागेल त्याला शेततळे, पीएमएफईएम, पीएम किसान , फळपीक विमा योजना, जमीन आरोग्य पत्रिका महत्त्व, मग्रारोहयो फळबाग लागवड योजना, शेतकरी अपघात विमा इत्यादी योजनेंबाबत कृषी सहाय्यक घोबाळे यांनी मार्गदर्शन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : केतन पिलणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा