New Government Medical Colleges Approved in Maharashtra: अखेर राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये होण्यास मंजुरी मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या जागा उपलब्धता व बांधकामाच्या प्रगतीसंदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
यादरम्यान राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत . यात वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर या जिल्यांचा समावेश आहे . या जिल्ह्यांमध्ये हि महाविद्यालये बांधण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी यासाठी सर्व विभागांनी सहकार्याने आणि समन्व्ययाने काम करून कारवाई करणे गरजेचे आहे . यासाठी नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी शासन मान्यता मिळाली आहे. यामुळेच जागांची पाहणी करून जागा निश्चित करणे आणि या सर्व कामांसाठी सल्लागार संस्था नियुक्त करणे आवश्यक आहे .कोणत्याही कामात दिरंगाई होऊ नये याची स्थानिक प्रशासनाने काळजी घ्यावी असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत
यासोबतच सिंधुदुर्ग, जालना, अमरावती, वाशिम, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली, परभणी व हिंगोली ह्या जिल्ह्यांमध्ये ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालये बांधण्याचे काम सुरु आहे ज्यांची क्षमता १०० विद्यार्थी बसण्याची आहे याशिवाय ४३० खाटांचे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू आहे. या महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी जास्तीत जास्त निधीची आवश्यकता आहे , त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार सर्व कामांचा सुधारित सर्वसमावेशक प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.
यावेळी अनेक नेते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थिती होते .
न्यूज अनकट प्रतिनिधी; तनया रेडकर













































