मुंबई, दि. १६ जुलै २०२०: राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे तर सरकार बरोबर सर्व नेते मंडळी हे युद्ध पातळीवर काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यातीलच एक नाव आहे. जे राज्यभर दौरे करुन कोविड परिस्थितीचा आढावा घेत आहेत. सध्या देवेंद्र फडणवीस हे विरोधात आल्यापासून कामाच्या बाबतीत सक्रीय झाल्याचे पहायला मिळत आहेत, तर या मुळे ते नेहमच चर्चेत देखील राहत आहेत. अश्यातच सध्या सोशल मिडीया वर चर्चा आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या स्वताला कोरोना होण्याच्या विधानाची.
“मला कोरोना झाला तर मुंबईत सरकारी रुग्णालयात दाखल करा. मला खासगी रुग्णालयात दाखल करू नका.” असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे जवळचे मित्र गिरीश महाजन यांना फोन करून सांगितलं आहे. फडणवीस यांचे शब्द ऐकताच महाजन यांच्या अंगावर शहारे आले आणि काय बोलावं हेच त्यांना सुचेनासं झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. फडणवीस यांच्या या संभाषणाचा मेसेज ट्विटरवर तुफान व्हायरल झाला. त्यातील दोन ट्विट खुद्द महाजन यांनी रिट्विट केली आहेत. त्यामुळे फडणवीस यांनी फोन केल्याच्या वृत्ताला महाजन यांनी दुजोरा दिल्याचं स्पष्ट होत आहे.


या कोरोना काळात अनेक नेत्यानां कोरोनाची लागण झाली असून त्यातील काही यशस्वी रित्या मात करुन परतले आहेत. तर काही स्थानिक नेत्यानीं या व्हयरसमुळे जगाचा निरोप घेतला. अश्यातच देवेंद्र फडणवीसांचे हे संभाषण व्हायरल झाल्या पासून त्यांचे समर्थक, चाहते हे त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत असल्याचेही सोशल मिडियावर मोठ्या प्रनाणात दिसले.
न्यूज अनकट प्रतिनिधी