राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत देवयानी प्रथम

21

नृत्य मल्हार संस्थेच्या राज्यस्तरीय अंतरशालेय लोकनृत्य स्पर्धा हडपसर येथिल एस.एम.जोशी महाविद्यालयामध्ये झाले .या स्पर्धेत कदम वाकवस्ती ( ता.हवेली ) येथिल देवयानी ननवरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

देवयानी ही लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे यांची कन्या आहे. देवयानी एंजल स्कुल कदम वाकवस्ती येथे इयत्ता दुसरी मध्ये शिक्षण घेत आहे. देवयानीला लोकनृत्य शिशु घाटामध्ये प्रथम तसेच ओपन डान्स प्रकारात प्रथम व लोकनृत्य संघामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला. नृत्य मल्हार राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत राज्यभरतील शाळांनी सहभाग घेतला होता.