धम्मज्ञान चॅरेटेबल ट्रस्ट द्वारे धम्म मेळावा व सत्कार सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर, २४ मार्च २०२३: तथागत बुद्धांचा शांतता मंगल मैत्रीचा संदेश देणारी परभणी ते चैत्यभूमि मुंबई ५८० किलोमीटर धम्मपद यात्रेचं यशस्वीरित्या आयोजन करुन यात्रा यशस्वी पूर्ण केल्यामुळं समाजात नवचैत्यन्य निर्माण झालं. त्याबद्दल भव्य नागरी सत्काराचं आयोजन धम्मज्ञान चॅरेटेबल ट्रस्ट द्वारे छत्रपती संभाजीनगर येथील सूतगिरणी चौक, गारखेडा परिसर येथे करन्यात आलं.

परभणी ते चैत्यभूमि मुंबई भव्य धम्मपद यात्रा यशस्वी केल्याबद्दल आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सिने अभिनेता, धम्म प्रचारक गगन मलिक यांच्यासह धम्म पदयात्रेत सहभागी झालेल्या धम्म पदयात्री, विविध संस्था संघटनांचा सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. तसंच याप्रसंगी सुप्रसिद्ध गायिका कडूबाई खरात, गायिका- पंचशिलाताई भालेराव, गायक – अजय देहाडे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रम झाला.
यावेळी या कार्यक्रमाला डॉ. सिद्धार्थहत्ती अंबिरे, सिनेअभिनेता गगन मलिक, प्रा. डॉ.ऋषिकेश कांबळे, पँथर नेते लक्ष्मण भूतकर सह मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपसिका यावेळी उपस्थित होत्या.

न्युज अनकट प्रतिनिधी: विनोद धनले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा