मुंबई, ६ सप्टेंबर २०२३ : कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या संवेदनशीलतेची आणि आपल्या सहकाऱ्यांबाबतची आत्मीयता अनेक वेळा दिसून आलीय. याची प्रचिती आज पुन्हा एकदा झाली. त्यांच्या परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात झाला. धनंजय मुंडेना याबाबत कळताच कॅबिनेट बैठक व आपल्या हातची सर्व महत्त्वाची कामे सोडून मंत्री मुंडे त्यांच्या मदतीला धावून गेले.
परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह अन्य तीनजण आज मुंबईकडे जात होते. डिव्हायडरला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात दिपक देशमुख यांच्यासह तीनजण जखमी झाले. हा अपघात झाल्याचे मंत्री मुंडे यांना कळताच आपल्या सर्व नियोजित बैठका सोडून, त्याचबरोबर कॅबिनेटची बैठक सोडून ते तातडीने रुग्णालयात दाखल झाले. अपघातग्रस्तांना सुरुवातीला मुंबईच्या सायन हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर भाटिया हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
मंत्री मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, कार्यालयीन कर्मचारी राणे, हाके आदींने या अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी तत्काळ यंत्रणा कार्यान्वित केली. मंत्री मुंडे यांनी उपचारांची सर्व ती व्यवस्था स्वतः जातीने लक्ष देऊन केल्याचे पाहायला मिळले. त्याचबरोबर सर्वांना धीर देताना ते दिसले. आता जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर