‘धन्वंतरीत’ पुढील आठवड्यात

14

आरोग्य विषयी आपण कशाप्रकारे काळजी घ्यावी तसेच होणाऱ्या आजारांपासून कसे वाचावे यासाठी ‘ न्यूज अनकट ‘ आपल्यासाठी घेऊन आले आहे ‘धन्वंतरी’ सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातील तीन दिवस वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आपल्या भेटीला येणार आहेत. कोविड – १९ च्या या काळात आपण कोणती काळजी घ्यायला हवी किंवा कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबाबत सर्व माहिती ‘ अपोलोचे तज्ञ डॉक्टर ‘ आपल्याला देणार आहेत.

• सोमवार , दि. २२ जून २०२०:

डॉ. अमोल कुमार पाटील: रोबोटिक सर्जरी विषयी लोकांच्या मनात अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. काही लोकांना याविषयी भीती देखील आहे. परंतु याविषयी आपले संपूर्ण निराकरण करण्यासाठी आणि रोबोटिक सर्जरी चे फायदे सांगण्यासाठी डॉक्टर अमोल कुमार पाटील हे आपल्या भेटीस या सोमवारी दि. २२ जून २०२० रोजी येणार आहेत. डॉक्टर अमोल कुमार पाटील हे नवी मुंबई मधील अपोलो रुग्णालयांमध्ये कार्यरत आहे.

• बुधवार दि. २४ जून २०२०

डॉ. संजीव जाधव: कोविड -१९च्या काळामध्ये विशेष करून ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा व्यक्तिंना जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हदयविकार आणि कोविड -१९ या विषयावर संपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी या येत्या बुधवारी (दि. २४ जून २०२०) आपल्या भेटीस डॉक्टर संजीव जाधव येणार आहेत. डॉक्टर संजीव जाधव हे नवी मुंबई मधील अपोलो रुग्णालयांमध्ये कार्यरत आहेत.

• शुक्रवार दि. २६ जून २०२०

या शुक्रवारी देखील आपल्या भेटीस नवीन विषय घेऊन एक नवीन तज्ञ आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या भेटीस येणार आहेत. आरोग्य विषयी अशीच महत्वपूर्ण माहिती घेण्यासाठी पाहत राहा ‘धन्वंतरी’.