धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भात बिहार सरकारनं जारी केली मार्गदर्शक तत्व

पटना, १० ऑक्टोबर २०२० : आगामी सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ,मोठ्या संख्येनं एकत्र येणाऱ्या नागरिकांसाठी आणि धार्मिक कार्यक्रमांच्या संदर्भात बिहार सरकारनं मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यांनुसार मंदिरं आणि घरांमध्ये दुर्गा पूजेचं आयोजन कुठल्याही विशेष सजावटीशिवाय करता येणार आहे.
गर्दी टाळण्यासाठी प्रसाद वाटप, मेळे ,दांडिया ,गरबा आदि कार्यक्रमांच्या आयोजनाला मनाई करण्यात आली आहे. दुर्गा पूजेदरम्यान ध्वनिवर्धकांच्या वापरावर बंदी असून, या ठिकाणी आयोजकांनी पुरेशा प्रमाणात मास्क आणि सॅनिटायजरचा साठा ठेवणं आणि त्याचा वापर करणं अनिवार्य राहील.
दरम्यान बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुका आणि वाल्मिकी नगर लोकसभेच्या उपनिवडणुकांच्या दरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात राजकीय सभा आणि त्या क्षेत्राबाहेर मोकळ्या जागांवर सभांचं आयोजन करण्यासंदर्भातही मानक कार्यपद्धती जारी करण्यात आली आहे. त्यानुसार सुरक्षित अंतर राखण्यासाठी ५० टक्के जागेचा वापर करता येणार असून जास्तीत जास्त २०० जणांना  एकत्र येण्यासाठी परवानगी राहील.
न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा