कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत धावत्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट

कदम वाकवस्ती, २६ डिसेंबर २०२०: पुण्याकडे जाणाऱ्या स्वाती ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला आग लागल्यानंतर चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत लातुरहुन पुण्याकडे जाणाऱ्या स्वाती ट्रॅव्हल्सच्या धावत्या बसला आज शनिवारी सकाळी पाऊने आठ वाजनेच्या सुमारास अचानक आग लागली. 
 
    घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी लोणी काळभोर पोलिसांच्यासह अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले व बसचा टायर फुटल्याने, टायरसह बसलाही आग आगली. बस चालकाच्या प्रसंग सावधानतेमुळे बसमधील २९ प्रवाशी मात्र सुखरुप बाहेर पडले आहेत. 
 
    लोणी काळभोर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लातुर जिल्हातील मुखेडहुन पुण्याला जाण्यासाठी शुक्रवारी ता. २५ सायंकाळी सात वाजनेच्या सुमारास स्वाती ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे रवाना झाली होती, यात अकरा महि्लांच्यासह २९ प्रवाशी प्रवास करत होते. 
 
   वरील बस आज शऩिवारी सकाळी सात वाजनेच्या सुमारास उरुळी कांचन जवळ बंद पडली. यावेळी बस चालकाच्या छोट्याशा प्रयत्नानंतर बस चालु झाली. ही बस लोणी काळभोर हुन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील दत्त मंदीराजवळ येताच, बसचा उजव्या बाजुचा मागिल टायर फुटला व टायर फुटताच टायरने प्रथम पेट घेतला. टायरने पेट घेतल्याचे लक्षात येताच बस चालकाने बस रस्त्याच्या एका बाजुला घेऊन बसमधील प्रवाशांना खाली उतरवले व प्रवाशी बस मधुन खाली उतरत असतानाच, बसनेही मागिल बाजुकडुन अचानक पेट घेतला.
 
    बस मधील प्रवाशी खाली उतरले असले तरी, प्रवाशांचे खाण्या- पिण्याचे साहित्य, प्रवाशी बॅग जळुन खाक झाल्या आहेत. 
 
     दरम्यान आगीची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांच्यासह वाघोली व हडपसर येथील अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले व तब्बल अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
 
     त्याचवेळी लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, जिल्हा वाहतुक शाखेचे युराज नांद्रे, व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊऩ, बसमधील प्रवाशांना धिर देण्याबरोबरच प्रवाशांना त्यांच्या घऱी जाण्यासाठी मदत केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.
 
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वर शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा