ढेकळेवाडीत बिबट्याने पाडला शेळीचा फडशा

बारामती: कन्हेरी पाठोपाठ ढेकळवाडी येथील टकले वस्तीवर बिबट्याने शेळीवर झडप घातली. यामध्ये शेळीचा मृत्यु झाला आहे. लागोपाठ घडणाऱ्या बिबट्याच्या हल्लाच्या
सत्रामुळे परिसरात बिबटयाने दहशत पसरली आहे.

ढेकळवाडी येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आनंद टकले (टकलेवस्ती ) यांच्या घराच्या बाजूला गोठ्यात बिबट्याने घुसुन शेळीवर हल्ला केला. या हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला. घरानजीक असलेल्या कुत्र्याच्या  आरडाओरड्याने बिबटयाने घराशेजारी असलेल्या उस पिकात धुम ठोकली . या घटनेने काटेवाडी, कन्हेरी सह ढेकळवाडी परिसरात बिबट्याची दशहत पसरली आहे. या घटनेच्या ठिकाणी वन
विभागातील पथकाने  घटना परिसरात पाहणी केली. पाहणीमध्ये शेळी वर बिबत्यांनी हल्ल्या केल्याचे पथकातील अभिजीत माले, व राज सय्यद यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात बारामती एमआयडीसीत वावर असलेल्या बिबट्याने आता बारामती तालुक्यातल्या काटेवाडी, कन्हेरी परिसरातही दहशत माजवली.
या बिबट्याने सोमवारी (दि.२१) रोजी सायंकाळी मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. यावेळी मेंढपाळाने प्रसंगावधान राखून या बिबट्याला पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
सलग सहा दिवसांपासून या बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरु आहे. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता दिलीप काळे यांचे गोठ्यातील बोकड तसेच सध्यांकाळी साडेनऊ वाजता तानाजी देवकाते यांचे बोकड मानकुटीला धरून शेतात धुम ठोकली. तर शुक्रवारी ( दि. २४ ) रोजी पहाटे साडेतीन वाजता ढेकळवाडी येथे टक ले वस्तीवर  शेळी वर झडप घातली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा