बीड, दि.१जुन २०२० : गावात दारुबंदी करण्याची जबाबदारी ज्यांची आहे त्याच सरपंचांनी स्वतः दारू पिवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी केज पोलीसात त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच हे केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील आहे.
गावात दारुबंदी, गुटखा बंदी आणि नशाबंदी राबवून गाव तंबाखू मुक्त करण्यासाठी विविध योजना राबवून गावाचा विकास करावा, अशी अपेक्षा गावच्या सरपंचांकडून असते. तसेच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांच्या सूचना व आदेशाचे गाव पातळीवर पालन करुन त्यांना राबवून कार्यवाही करण्याचे काम करावे लागते.
मात्र केज तालुक्यातील बोबडेवाडी येथील संतोष क्षिरसागर या सरपंचाने बोबडेवाडी येथे महादेव मंदीराकडे जाणारा रोडवर कोरोना विषाणू रोगाचा संक्रमणाचा फैलाव होवु शकतो. हे माहीत असताना देखील विनाकारण दारुच्या नशेमध्ये रोडवर फिरुन जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या संचारबदीचे उल्लंघन केले. तसेच सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन मानवी जीवीतास व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन संसर्ग पसरविण्याची घातक कृती करुन कोरोना विषाणु पसरविण्यास पोषक वातावरण तयार केले.
या मद्यपी सरपंचाच्या मर्कट लीलांची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविताच जमादार दिनकर पुरी यांच्या फिर्यादीवरून पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह.धनपाल लोखंडे हे पुढील तपास करीत आहेत.
न्युज अनकट प्रतिनिधी: