गोल पोस्ट राष्ट्रीय धोनी आणणार सैनिकांसाठी कार्यक्रम

धोनी आणणार सैनिकांसाठी कार्यक्रम

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार तसेच यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आता एका नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.
विश्वचषकानंतर आर्मीबरोबर सराव करण्यासाठी धोनी काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये होता. यावेळी त्याने आर्मीतील जवानांचे काम जवळून पाहिले आहे.
या अनुषंगानेच धोनी टीव्हीवर एक मालिका घेऊन येणार असल्याची चर्चा आहे. या मालिकेमध्ये भारतीय सैनिकांची शौर्यगाथा दाखवण्यात येणार आहे.
या मालिकेची संहिता लिहिण्याचे काम सुरु असून काही दिवसांमध्येच या मालिकेचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या मालिकेसाठी धोनीची निवड केली असल्याची चर्चा आहे.
इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर धोनी एकदाही आंतरराष्ट्रीय स्तरावर मैदानात उतरलेला नाही. यामुळे त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. यावर अनेक क्रीडातज्ञांनी मतमतांतरे व्यक्त केली होती. दरम्यान, धोनी नव्या भूमिकेत दिसणार असल्याच्या शक्यतेमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

error: Content is protected !!
Exit mobile version