नवी दिल्ली: विश्वकप स्पर्धा संपल्यानंतर धोनीने मैदानावर पाऊल ठेवले नव्हते. काश्मीर मधील कलम ३७० रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर धोनीला जम्मू कश्मीर भागात नागरिकांना सौरक्षण देण्यासाठी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे गेले काही महिने तो क्रिकेट पासून लांब राहिला होता.
अखेर त्याने शुक्रवारपासून रांची येथे सरावाला सुरुवात केली आहे. मात्र वेस्ट इंडिज विरुद्ध पुढील महिन्यात होणाऱ्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल. हे बीसीसीआयने या आधीच स्पष्ट केले होते. विश्वकरंडक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर धोनी ने क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवले नाही. आधी विश्रांती आणि नंतर लष्करातील सेवेसाठी वेळ दिल्यामुळे दोन्हीच्या पुनरागमनाविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. रांची येथील जेएससीए च्या मैदानावर त्याने सरावाला सुरुवात केली आहे काल दिवसभर धोनी्चया सर्वांची चर्चा रंगली होती.