गोल पोस्ट स्पॉटलाइट सौरव आणि सचिनच्या “या” फोटोची सोशल मीडियावर धूम

सौरव आणि सचिनच्या “या” फोटोची सोशल मीडियावर धूम

मुंबई, दि१५ मे २०२०: सध्या लोकांच्या सर्वात जवळ आणि लवकर पोहचण्याचे साधन म्हणजे सोशल मीडिया. यापासून कोणतीही गोष्ट लपून रहात नाही. सध्या सोशल मीडियावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली सोबत जेवण करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मिडीयावर या फोटोची जोरात चर्चा होत आहे. हा फोटो सौरव गांगुली याच्या घरातला आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरने स्वत: गुरुवारी(दि.१४) रोजी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट करून त्याविषयीच्या आठवणी शेअर केल्या.

हा फोटो २००० साला मधील आहे. सचिन तेंडुलकर खाण्याचा शौकीन आहे हे आपल्याला माहीतच आहे. या फोटोत सौरव गांगुलीची आई देखील दिसत आहे. त्यावेळी आपल्या घरी सचिन येणार म्हणून सगळे कुटुंब सचिनच्या पाहुणचारासाठी उपस्थित राहिले होते.असे चित्र या फोटोतून दिसत आहे.

सचिनने फोटो पोस्ट करताना लिहिले की, ही एक सौरव गांगुलीच्या घरातली संध्याकाळ आहे. त्या संध्याकाळी मला उत्तम जेवण आणि चांगले पदार्थ खायला मिळाले. आशा आहे की तुमची आई चांगली आहे आणि मी तिला शुभेच्छा देतो. अशी माहिती या फोटो सोबत पोस्ट करण्यात आली आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

error: Content is protected !!
Exit mobile version