गोल पोस्ट आरोग्य विलगीकरण कक्षातील नागरिकांची राजेंद्र गुंड यांनी केली पाहणी

विलगीकरण कक्षातील नागरिकांची राजेंद्र गुंड यांनी केली पाहणी

कर्जत, दि.१५ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे विलगीकलण कक्षात ठेवण्यात आलेल्या नागरिकांची अध्यक्ष राजेंद्र गुंड यांनी पाहणी करून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत कोणत्याही गोष्टीची अडचण भासल्यास संपर्क साधावा अशीही सुचना दिली.
गुंड यांनी गावातील कोरोना समितीला सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत या नागरिकांना कशाची ही कमतरता पडू नये असे ही सांगितले.

यावेळी गावातील कामांची गुंड यांनी पाहाणी ही केली. त्या वेळी गावचे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक श्याम भोसले, पोलिस पाटील सांगळे, ग्रामपंचायत सदस्य मोतीराम कासारे, ग्रामपंचायत सदस्य बापू खुरंगे, लाला काळे, किसन कासारे, बापू कांबळे, भागवत धालवडे, ग्रामपंचायतीचे क्लार्क रघुनाथ ननवरे उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

error: Content is protected !!
Exit mobile version