धुळे, ६ ऑगस्ट २०२२: धुळे शहरातील कुमार नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री गोळीबार करत तरूणांची हत्या करण्यात आली आहे. या गोळीबारात चिनू ऊफ चंद्र राजेंद्र पोपली हा तरुण ठार झाला आहे. या हल्ल्यानंतर धुळे शहरात एकच खळबळ पसरली आहे.
या गोळीबारात दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची पोलीसांनी कसून चौकशी केली असता पोलीसांना माहीती मिळाली.
शुक्रवारी मध्यरात्री ही घटना झाली असून या घटनेनंतर पोलीसांकडून संशयित आरोपींची चौकशी सुरू केली. पैशांच्या वादातून ही घटना झाली असल्याची माहीती पोलीसांनी दिली आहे. घटनास्थळी पवन हत्या झाली तेव्हा होता. त्याने ही संपूर्ण घटना पाहिली असून पोलिसांनी माहिती दिली.
चिनूवर हल्ला करण्याआधी तिघे हल्लेघोर चिनू याच्या घरी गेले होते. तिथे काही सापडले नाही म्हणून सगळे चौकात येऊन बसले होते. या आधी बाचाबाची झाली. त्यांच्यात त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर देसी कट्टाने गोळी झाडून खून करण्यात आला. या हल्ल्यानंतर जखमी चिनूला रूग्णालयात दाखल केले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.
न्युज अनकट प्रतिनिधी: विजय सपकाळ