पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस मशिन बंद

पुणे २४ जून २०२३: महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमधील, १५ मशिनपैकी १३ मशिन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. कमला नेहरू रुग्णालयात लायन्स क्लब ऑफ पूना, मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडून डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले आहे. शहरातील गरीब लोकांना माफक दरात सुविधा उपलब्ध व्हावी, या हेतूने हे सेंटर सुरू केले होते. पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर त्यांना पाच वर्ष कालावधी वाढवूनही देण्यात आला आहे.

या सेंटरमध्ये ४०० रुपयात डायलिसिस केले जाते. पण या सेंटरमधील १५ मशिनपैकी १३ मशिन सध्या बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्याने, सहायक आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा नाईक यांनी या सेंटरची पाहणी केली. यावेळी या सेंटरमध्ये नेफ्रालॉजिस्ट अथवा डॉक्टर तसेच वैद्यकीयदृष्ट्या माहिती असलेली परिचारिका कार्यरत नसल्याचे तसेच सेंटरमध्ये अस्वच्छता आढळून आली.

येथील जैववैदयकीय कचरा गेल्या एक ते दीड वर्षापासून साठवून ठेवला असून, त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापालिकेने सेंटरला २५ हजारांचा दंड केला आहे. महापालिका प्रशासनाने लायन्स क्लब हे सेंटर चालविण्यास असमर्थ असल्याचा ठपका ठेवला व संस्थेकडून खुलासा देखील मागविला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा