हुकूमशहा किम जोंग उन २१ दिवसानंतर आला जगासमोर

उत्तर कोरिया, २ मे २०२०(वृत्त संस्था): गेल्या काही दिवसांपासून गायब असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन २१ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सर्वांसमोर आला आहे. त्यामुळे त्यांच्या बाबत उठणाऱ्या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी किम जोंग उन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. तसेच काही प्रसार माध्यमांनी त्यांच्या मृत्यूच्याही बातम्या दिल्या होत्या. त्यामुळे नवीन हुकूमशहा होणार अशा चर्चांना देखील उधाण आले होते.त्यांच्या येण्याने सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळाला आहे
त्यांच्या याबाबत उत्तर कोरियातील सरकारी न्यूज एजन्सीनं वृत्त दिले आहे.

२१ दिवसानंतर शुक्रवारी(दि.१)रोजी किम एका सार्वजनिक कार्यक्रमात कारखान्याच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात पहायला मिळाले.

किम जोंग उन यांनी सुनचिओनमध्ये एका कारखान्याच्या उद्घघाटन समारंभाला हजेरी लावली होती. हे ठिकाण राजधानी प्योंगयांगच्या जवळ आहे. किमची बहीण किम यो जोंग देखील या कार्यक्रमाला उपस्थित होती. ११ एप्रिल रोजी किम जनतेसमोर आले होते. त्यानंतर ते गायब झाले आणि १ मे रोजी उद्घघाटन सोहळ्यात दिसले. त्यामुळे त्यांच्या इतर पसरत असलेल्या अफवांना पूर्ण विराम मिळाला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा