दिड महिन्यांपासून करपडीत भीषण पाणी टंचाई

कर्जत: १० मे २०२० : करपडी ग्रामस्थ हे गेल्या दीड महिन्यापासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जात आहे. कोरोनाच्या संकट काळात टँकरचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले असुन त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

ग्रामपंचायतीने दीड महिन्यापुर्वी पंचायत समितीमध्ये टँकरचा प्रस्ताव सादर केला आहे. तरी अद्याप त्यास मंजुरी न मिळाल्याने कलपडी ग्रामस्थानचा सहनशीलतेचा बांध फुटू लागला आहे.

सध्या परिस्थितीमध्ये कलपडी ग्रामस्थ पाणी विकत घेत आहेत. २०० लिटरच्या बॅरलसाठी ५० रूपये मोजावे लागतात आहेत. पाणी पुरवठा करणारा तलाव हा तीन महिने कोरडा पडला असून, टॅकरने पाणी पुरवठा करणे अत्यंत गरजेचे आहे.

ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केल्यानंतर पंचायत समिती लपाचे उपअभियंता सी.एम.पवार गावात येऊन पाणी पुरवठा करणारे जलाशय तलाव ,विहीर बोरवेल पाहणी करुन ग्रामपंचायतीस तोडी टॅकरची गरज असल्याचे सांगीतले होते.व तात्काळ पाणीपुरवठा करू असे सांगितले होते.

मात्र अद्याप टँकर सुरू न झाल्याने ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागल आहे. या पार्श्वभूमीवर गावात बैठक घेण्यात आली त्यावेळी सरपंच भागवत खेसे, ग्रा.प.स.सुनिल काळे, अशोक माने, कांताबाई कांबळे, ग्रामसेवक वर्षा थोरात उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:जयहिंद पौरष

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा